PM विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना 15,000/-रुपये मिळणार ; जाणून घ्या सविस्तर योजना !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Those working in the private sector will get Rs. 15,000/- under PM Developed India Employment Scheme ] : खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खास योजना सुरु केली आहे . सदर योजना अंतर्गत 15,000/- रुपये मिळणार आहेत , याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे घेवूयात .

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधुन सदर पंतप्रधान विकसित भारत योजना अंतर्गत खासगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सदर योनजा सुरु केली आहे , या योजनेचा लाभ देशातील तब्बल 3.5 कोटी तरुणांना होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .

लाभ नेमका कोणाला मिळणार ? : या योजनेच्या माध्यमातुन दि.01.08.2025 ते दि.31.07.2027 पर्यंत खासगी क्षेत्रांमध्ये प्रथम नोकरीस रुजू होणाऱ्यांना 15,000/- दोन टप्यात मिळणार आहेत .

सदरची रक्कम ही EPFO मध्ये दोन टप्यात वर्ग केली जाणार आहे . याकरीता प्रमुख अट म्हणजे सदर कर्मचाऱ्याचा पगार हा 1 लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक असेल . त्यापेक्षा अधिक पगार असणाऱ्यांना सदर योजनेतुन लाभ मिळणार नाही .पहिला हप्ता प्राप्त झाल्याच्या नंतर दुसरा हप्ता हा नोकरीच्या 12 महिने नंतर दिला जाईल .

हे पण वाचा : सरकारी कर्मचारी संदर्भात निर्गमित महत्वपूर्ण GR  ..

अर्ज प्रक्रिया कशी असेल ? : याकरीता आपणांस श्रम सुविधा पोर्टलवर खाते तयार करुन EPFO क्रमांक प्राप्त करावा लागेल . त्यानंतर EPFO पोर्टलवर लॉगिन करुन नविन कर्मचारी नियुक्त करायचे . यांमध्ये पीएफ योगदान मासिक ECR रिटर्न दाखल करावे लागेल . त्यानंतर आपणांस सदर योजनाच्या माध्यमातुन , लाभ मिळेल .

Leave a Comment