Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Warning signs in the state for the next 4 days; Heavy rain likely to cause major damage ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे पुढील चार दिवस अति-धोक्याचे संकेत देण्यात आले आहे.
पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे नागरिकांची गैरसोय होईल , याकरीता सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्राचा परिसरात अतिवृष्टी सह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
या दरम्यान वीजांच्या गडगडांसह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . आपत्कालीन स्थितीमध्ये 24 x 7 कार्यरत असणारी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून , 022-22027990 / 022-22794229 अथवा 022-22023039 व मोबाईल क्रमांक 9321587143 असे आपत्कालिन नंबर कार्यन्वित करण्यात आले आहेत .
राज्यात या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता : दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यातील मुंबई उपनगर , ठाणे , पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच अमरावती विभाग , अकोला जिल्हा मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026