Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ This work will have to be done in all offices for the concepts of administrative innovation, excellence and good governance. ] : प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिप्राय पेट ठेवणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.04.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये उत्कृष्टता , प्रशासकीय नाविन्यता , सुशासन या संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे अभिप्राय प्राप्त करुन घेणेकरीता एक सुसुत्रित कार्यपद्धती राबविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांकरीता …
अभिप्राय प्रारुप उपलब्ध करुन देण्यात येत आहे . हे अभिप्राय पेटी कार्यालयाच्या दर्शनी भागात जवळच उलब्ध असावेत असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच याशिवाय कुणाला कागदावर लिहून काही अभिप्राय द्यावयाचे असल्यास त्यास प्रारुपाचे बंधन नसावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सरकारी कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांना सदर अभिप्राय सादर करण्याकरीता कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर अभिप्राय प्रारुपांमध्ये नागरिकांना कार्यालयीन स्वच्छता , सेवा देण्याची पद्धत , नागरिकांशी वागणूक , कामकाजातील सुलभता , या मुद्यांवर 01 ते 05 इतके गुणांकण सादर करता येईल तसेच त्यांना आलेल्या अनुभवांवर मुक्त स्वरुपात त्यांचे अभिप्राय नोंदवून सदर अभिप्राय कुलुपबंद पेटीमध्ये टाकता येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
कार्यालयांमध्ये भेट देणाऱ्या अभ्यागतांबरोबरच त्या कार्यालयाच्या आस्थापनेतील अधिकारी / कर्मचारी सुद्धा शासन अधिकाधिक लोकाभिमुख कसे होवू शकेल तसेच विकासात्मक व प्रशासकीय दृष्टीने शासकीय योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत . याबाबत अभिप्राय या यंत्रणेद्वारे देवू शकणार आहेत .
सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026