राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभाग मार्फत दि.11.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important GR issued on 11.07.2025 through the State Government Department in the case of officers/employees in the State Government Service ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील गट अ , ब , क व ड संवर्गातील अराजपत्रित कर्मचारी विरोधात प्रलंबित असणारे विभागीय चौकशी लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या अनुषंगाने संनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत .

सदर कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी दुर करुन पर्यायाने विभागीय चौकशीच्या प्रकरणांचा त्वरेरे निपटारा करण्याच्या अनुषंगाने सदर परिपत्रकांमध्ये नव्याने आदेश देण्यात आले आहेत .

प्रलंबित प्रकरणे हाताळणे कामी तसेच यापुढे भविष्यात उद्भवणारे चौकशी प्रकरण करीता उप/सह सचिव हे पदसिद्ध नोडल अधिकारी यांची नियुक्ती असणार आहे . तसेच क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विभागीय चौकशी प्रकरणांच्या अनुषंगाने विभागीय चौकशी संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच विभागीय चौकशी प्रकरणांमध्ये चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशांमध्ये न चुकता नोडल अधिकाऱ्याचे नाव , कार्यालयीन पत्ता , पदनाम , ई-मेल आयडी , संपर्क क्रमांक व त्या आदेशांच्या प्रति नोडल अधिकाऱ्यास अग्रेषित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच नोडल अधिकारी यांनी सदर प्रकरणी करावयाचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .

Leave a Comment