Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on 29.07.2026 regarding the sanction of an incentive allowance of 30% of the basic pay in accordance with the 7th Pay Commission. ] : सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30 टक्के प्रोत्साहन भत्ता मंजूर करणेबाबत गृह विभाग मार्फत दि.29.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्यात अवैध अंमली पदार्थ्यांच्या तस्करीत आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या कामाचे स्वरुप व जोखीम विचारात घेता , अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स …
मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतनश्रेणीतील मुळ वेतनाच्या 30 टक्के इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून मंजूर करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे .
सदर प्रोत्साहन रक्कमेवर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत , अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मधील कार्यरत पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार मुळ घटकात परत गेल्यास त्यांना सदरचा प्रोत्साहन भत्ता देय होणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सदर प्रोत्साहन भत्ता दि.01 ऑगस्ट 2026 पासुन अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .


- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR