Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 29.07.2026 regarding the prescription of a time-bound procedure for promotion to various posts within the teaching cadre. ] : शिक्षक संवर्गातुन विविध पदांवर पदोन्नती साठी कालबद्ध कार्यपद्धती विहीत करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.29.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , जे शिक्षक टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवाप्रवेश नियमानुसार , आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत , त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचार क्षेत्रात करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच दिनांक 10 जुलै 2026 पुर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पुर्ण झाली आहे , अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे . तसेच ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत . त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पुर्ण झाली आहे असे समजण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच पदोन्नती प्रक्रिया पुर्ण झाली आहे , अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते , मात्र दि.14 मे 2026 रोजीच्या शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
चालु वर्षीच्या पदोन्नतीबाबत : माहे ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व टीईटी / सीटीईटी सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत .


- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR