Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ protsahan Bhatta increase shasan paripatrak ] : वित्त विभाग मार्फत दि.08.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त / अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये व कमाल 1500/- रुपये मर्यादेत …
प्रोत्साहन भत्ता कोषागार / उपकोषागार कार्यालयाकडून अनुज्ञेय करण्याचे निर्देश संबंधित कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत . सदर भत्ता हा सातवा / सहावा वेतन आयोगातील मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये तर कमाल 1500/- रुपये कमाल मर्यादेत दरमहा भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
सदर भत्ता हा नक्षलग्रस्त / अतिसंवेदनशील क्षेत्रांमध्ये मुख्यालयी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात येणार आहे . मात्र नक्षलग्रस्त / अतिसंवेदनशील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही .
या निर्णयामुळे आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक / कर्मचाऱ्यांना सदर वाढीव प्रोत्साहन भत्ताचा लाभ मिळणार आहे . तसेच देय असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कम देखिल अनुज्ञेय केली जाणार आहे .
निवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
याचा मोठा लाभ कमी मुळ वेतन असणाऱ्यांना कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात होता , त्यांना आता दरमहा वेतनात 1500/- रुपयांची वाढ होणार आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता Click Here
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !