Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Positive consideration of these key demands of government employees in the Eighth Pay Commission… ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणींचा समावेश असेल .
निवृत्तीचे वय : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे देशांमध्ये एकसमान करण्याची मागणी अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून केली जाते . काही राज्यांमध्ये निवृत्तीचे वय हे 60 तर काही राज्यांमध्ये निवृत्तीचे वय हे 58 वर्षे इतके आहे . यांमध्ये एकसुत्रता आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार मार्फत केला जाण्याची शक्यता आहे .
अतिरिक्त कामाचा मोबदला ( Overtime ) : आजच्या काळांमध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर येतो . याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक कार्यालयांमध्ये मंजूर पदांपैकी 70 टक्के पदभरती करण्यात आलेली आहे . अनेक पदे रिक्त आहेत . यामुळे अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर निर्माण होतो .
यामुळे अतिरिक्त कामाचा मोबदला दिला अशी कर्मचाऱ्यांच्या मागणींचा सकारात्मक विचार आठवा वेतन आयोगांमध्ये केला जाण्याची शक्यता आहे . यांमध्ये कामाचे स्वरुप , तास यांचा विचार करुन मोबदला निश्चित केला जाणार आहे .
कर्मचाऱ्यांना संरक्षण : आजच्या सोशल मिडीयाच्या काळांमध्ये जनतेकडून कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दडपण येत आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांना धमक्या , फुरुती मागणी इ. प्रकार होतात . यामुळे कर्मचाऱ्यांना सरंक्षण मिळणे आवश्यक आहे . याकरीता सरकार मार्फत अधिक कडक कायदे करण्याच्या शक्यता आहे .
वेतन / भत्तांमध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ : कर्मचाऱ्यांना वेतनवाढ , इतर भत्तांमध्ये वाढ करण्याकरीता अधिकृत्त निर्णयाची आवश्यक असते . सदर निर्णयाला नेहमीच विलंब होतो , यामुळे वेतन वाढ , महागाई भत्ता इ. वाढ ही स्वयंचलित पद्धतीने करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;