राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mhtv@24 खुशी पवार प्रतिनिधी [ According to the new proposal of the state government, the working hours of employees will be increased, and night duty will also be given to female employees. ] : सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल आता यापुढे रात्रीच्या वेळी नोकरी करावी लागेल असे प्रस्तावांमध्ये नमुद आहे .

मंगळवारी राज्य मंत्रीमंडळासमोर राज्याच्या कामगार विभाग मार्फत राज्यातील खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत कामगारांच्या कामाच्या बाबतीत नविन नियमावली संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे . सदर प्रस्तावाला मंत्रीमंडळांकडून तुर्तास मंजुरी देण्यात आलेली नसुन , यांमध्ये आवश्यक सुधारणा साठी विभागास सुचित करण्यात आले आहेत .

कामाचे तास : सदर प्रस्तावांमध्ये काही प्रमुख बदल प्रस्तावित आहेत , ज्यांमध्ये पहिला महत्वपुर्ण बदल म्हणजे खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत कामगारांचे कामाचे तास हे 10 तास पर्यंत वाढविण्यात येणार आहेत ( सध्यस्थितीत खाजगी क्षेत्रातील कामगारांकरीता 9 तास आहे . )

हे पण वाचा : राज्यातील गट अ ते गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.25.08.2025

ओव्हरटाईम मर्यादा : खाजगी क्षेत्रांमध्ये कामगारांस ओव्हरटाईम करण्याची सुविधा असते , सदर ओव्हरटाईम करीता त्यास अतिरिक्त वेतन अदा केले जाते . परंतु एक कर्मचारी हा 03 महिन्यांत केवळ 125 तासच ओव्हरटाईम काम करु शकतो . सदर ओव्हरटाईम मध्ये वाढ करुन 144 तास पर्यंत मर्यादा वाढविण्याचे प्रस्तावित आहे .

सदर सुधारणा ही 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम लागु करणे प्रस्तावित आहे . सदरची मागणी ही खाजगी क्षेत्रातील उद्योजकांची मागणीचा विचार करुन प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे हित देखिल विचारात घेण्यात आलेले आहेत .  

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment