मुंबई प्रतिनिधी , राहुल पवार : राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनांकडून कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहेत . अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सेवानिवयमांनुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपुर्व सेवानिवृत्तीची तरतुद करण्यात आलेली आहे .
परंतु या नियमांचे काठेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते , परंतु आता राज्य शासनांकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची राज्य शासनांकडून देण्यात आलेली आहे , यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे .
मुदतवपुर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे ? ; महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नियम 10 ( 4 ) आणि नियम 65 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 50 /55 वर्षांनंतर अथवा सेवेच्या 30 वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यात येतात , तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्यात येतात म्हणजेच मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात .
हे पण वाचा : शासकीय आश्रमशाळा मध्ये शिक्षक पदांसाठी महाभरती…
शासन सेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमुळे सेवा बजावत असताना कामामध्ये व्यत्यय / कमीपणा येवू नये याकरीता राज्य शासनांच्या नियमांनुसार कठोररित्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी श्री.एन पी.मित्रयोत्री यांनी सांगितले आहे .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR