शासनाच्या पदभरती प्रक्रिया मध्ये मोठी सुधारणा ; मंत्रीमंडळ निर्णय दि.13.04.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Major Reform in the Government Recruitment Process ] : शासनांच्या पदभरती प्रक्रिया मध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे . या संदर्भात दि.13.04.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , पदभरती प्रक्रिया अधिक सुटसुटीत , सक्षम व उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ करणेकरीता पदभरती प्रक्रिया मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

यानुसार संयुक्त परीक्षा योजनांमध्ये नव्याने 18 सेवा व 93 संवर्गांचा समावेश करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . तसेच UPSC आयोगाच्या धर्तीवर निपुण सेतु पोर्टल सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

सरळसेवा पदभरती 1400 हुन अधिक सेवाप्रवेश नियम अस्तित्वात असुन , विविध विभागांकडून स्वतंत्रतपणे परीक्षा घेतल्या जात होत्या , मात्र त्यात सुधारणा करुन परीक्षांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

उमेदवारांकरीता पदभरती संधी ( पदांची संख्या ) वाढविले जाणार आहेत . तसेच भरती प्रक्रिया अधिक सुलभ , पारदर्शक तसेच कालबद्ध व परिणामकारक केले जाणार आहे .तसेच सेवाप्रवेश नियमांमध्ये व्यापक असे बदल केले जाणार आहेत .

तसेच सेवांतर्गत पदोन्नती करीता स्वतंत्र संवर्ग संरचना व मृत संवर्गांची पुनर्रचना केली जाणार आहेत . तसेच 574 सेवाप्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे . तसेच शैक्षणिक पात्रता , अनुभव व कौशल्ये व प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहेत .

तसेच विविध संवर्गांतील विसंगती दुर करण्यावर भर दिले जाणार आहेत .याशिवाय शैक्षणिक व अनुभव निकष अधिक सामायिक , संसंगत व तर्कसंगत करण्यात येणार आहेत . तसेच सरळसेवा पदभरती करीता अनुभव अट लागु राहणार नाही .

महाराष्ट्र लोक सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा पद्धतीमध्ये एकुण 57 संवर्गांमध्ये पदभरती केली जाते , आता सुधारणा नंतर 45 नव्याने समावेश करण्यात येणार असून आता एकुण 102 संवर्ग होणार आहेत .

गट ब अराजपत्रित व गट क संवर्गांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक अशा गटांमध्ये वर्गीकरण केले जाणार आहेत . प्रशासकीय कामकाज असणारे 269 प्रशासकीय संवर्गांचे 18 गट व 221 तांत्रिक संवर्गांचे 30 गट याकरीता स्वतंत्र व अधिक कार्यक्षम भरती प्रक्रिया राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

नामनिर्देशन कोट्यातील व काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे . अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबाह्य संवर्ग म्हणून घोषित करण्यात येणार आहेत .

अरापत्रित संवर्ग करीता नो इंटरव्ह्यु पॉलिसी लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

Leave a Comment