Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision regarding pensions issued on 14.07.2026. ] : निवृत्तीवेतन संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.14.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे , ही बाब शासनाच्या विचाराधीन होती , त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा पत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेल्या दि.19.06.2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे .
यानुसार निवृत्तीवेतन करीता बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरुन अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये सादर करण्यास दि.01.08.2026 पासुन मान्यता देण्यात येत आहे .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR