Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important Update Regarding Salaries for the Month of March / April 2026; Circular Issued on April 23, 2026. ] : माहे मार्च / एप्रिल 2026 च्या वेतन संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहेत . या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दि.23.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , माहे मार्च / एप्रिल 2026 च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अडचणींच्या अनुषंगाने काही सुचना देण्यात आलेल्या आहेत . यानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शाळेमधील प्रत्यक्ष संचमान्यतेनुसार मान्य व कार्यरत पदे यांमध्ये कार्यरत पदे मंजुर संचमान्यता पदापेक्षा जास्त असल्यास , अशा प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या बाबतीत एकस्तर वरिष्ठ अधिकारी म्हणुन संबंधित शिक्षणाधिकारी …
यांनी तपासणी करुन त्यांचे लॉगिन मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच माहे मार्च / एप्रिल 2026 च्या वेतनाबाबत शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . ह्यापुढे सदर सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
तसेच शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच प्रथम नियुक्ती दिनांक / जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करण्याचे संबंधितांना आदेशासह कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर या संदर्भात कार्यवाही करुन माहे मार्च / एप्रिल 2026 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR