Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on 11.06.2026 regarding approval for upgradation and the creation of posts for that purpose. ] : श्रेणीवाढ व त्याकरीता पदनिमिर्तीस मान्यता देणेबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दि.11.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , आदिवासी विकास विभाग अंतर्गत 27 प्राथमिक आश्रमशाळांमध्ये माध्यमिक करीता व 15 माध्यमिक आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिक करीता श्रेणीवाढ देण्यास व मंजूर शासकीय आश्रमशाळांमध्ये गरजेनुसार श्रेणीवाढ व तुकडीवाढ करण्याचे अधिकार आदिवासी विकास विभागास देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
यानुसार 17 शासकीय प्राथमिक ते माध्यमिक आश्रमशाळा श्रेणीवाढ ( इयत्ता 8 वी ते 10 वी ) अशी मंजूरी देण्यात आली आहे .तसेच 28 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक ( कला व विज्ञान ) आश्रमशाळा श्रेणीवाढ ( इ.11 वी व 12 वी ) अशी श्रेणीवाढ देण्यात आली आहे .
तसेच 10 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक ( कला ) आश्रमशाळा श्रेणीवाढ ( इ.11 वी ते 12 वी ) अशी श्रेणीवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .तसेच 10 शासकीय माध्यमिक ते उच्च माध्यमिक ( विज्ञान ) आश्रमशाळा श्रेणीवाढ ( इ.11 वी व 12 वी ) अशी श्रेणीवाढ देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .तसेच सदर श्रेणी करीता आवश्यक पदनिर्मिती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .


या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..