@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ state employee Shasan Nirnay dated 23 January] : दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात तीन मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहे .
01. पदोन्नती पदस्थापना ( गृह विभाग ) : भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणी पदोन्नती व पदस्थापना देणे संदर्भात गृह खात्याकडून मंजुरी देण्यात आलेली आहे . यामध्ये एकूण 09 अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून पदस्थापना देण्यात आलेली आहे .
02. अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम ( सार्वजनिक बांधकाम विभाग ) : सार्वजनिक बांधकाम विभागातील संचालक , उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत सरळसेवेने व पदोन्नतीने कार्यरत अधिकारी , कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
03. अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणे ( उद्योग ऊर्जा व कामगार विभाग ) : उद्योग उर्जा व कामगार विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील तिन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here