Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Instructions regarding actions to be taken regarding financial matters by the end of March, 2025-26 ]: आर्थिक वर्ष 2025-26 अखेर मार्च महिना अखेर आर्थिक बाबी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना देणेसंदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 13.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि ,दिनांक 28.03.2026 , 29.03.2026 ( रविवार ) व दिनांक 31 मार्च 2026 ( महावीर जयंती ) या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीचे कामकाजाचे स्वरुपांमध्ये सदर दिवशी अधिदान व लेखा कार्यालय , जिल्हा कोषागारे व उपकोषागारे देयके स्विकृतीकरीता सुरु राहणार आहेत .
तरी आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर दिवशी देयके सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच उप -कोषागार कार्यालयांमध्ये दिनांक 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.00 नंतर देयके स्वीकृती बंद करुन जिल्हा कोषागारात सादर करण्याचे निर्देश आहेत .
तसेच दिनांक 31 मार्च 2026 रोजी शासकीय प्रदाने धनादेश ऐवजी ई-कुबेर द्वारे करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .तसेच काही विशिष्ट प्रकारची देयके दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई / जिल्हा कोषागारे कार्यालये / उप कोषागार कार्यालये येथे सादर करण्याचे निर्देश आहेत .
अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई / जिल्हा कोषागार / उप कोषागार कार्यालये यांनी आक्षेपित केलेली देयके दिनांक 25.03.2026 पर्यंत फेरसादर करण्याचे निर्देश आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click here
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026