Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Under Maharashtra Civil Services Rules, these state officers/employees will be liable ] : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर म.ना.सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत , महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भाधीन पत्रानुसार ग्राम विकास विभाग मार्फत दि.18.08.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , माहिती व तंत्रज्ञान विभाग मार्फत प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आलेली आहे .
सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी / कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपुर्वक लाभ घेवून शासनाची दिशाभुल केल्याची बाब विचारात घेवून संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये जिल्हा परिषदा मधील तब्बल 1183 अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे . जिल्हा परिषदा ही एक स्वायत्त संस्था असून , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तसेच शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे आहेत .
त्यामुळे सदर विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करुन द्यावे व त्याची प्रत ही ग्राम विकास विभागास उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025