Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on 29.07.2026 regarding the sanction of an incentive allowance of 30% of the basic pay in accordance with the 7th Pay Commission. ] : सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30 टक्के प्रोत्साहन भत्ता मंजूर करणेबाबत गृह विभाग मार्फत दि.29.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्यात अवैध अंमली पदार्थ्यांच्या तस्करीत आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या कामाचे स्वरुप व जोखीम विचारात घेता , अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स …
मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतनश्रेणीतील मुळ वेतनाच्या 30 टक्के इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून मंजूर करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे .
सदर प्रोत्साहन रक्कमेवर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत , अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मधील कार्यरत पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार मुळ घटकात परत गेल्यास त्यांना सदरचा प्रोत्साहन भत्ता देय होणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सदर प्रोत्साहन भत्ता दि.01 ऑगस्ट 2026 पासुन अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .


- विना-अनुमती गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत परिपत्रक दि.29.07.2026
- सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करणेबाबत GR निर्गमित दि.29.07.2026
- शिक्षक संवर्गातुन विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती विहीत करणेबाबत GR निर्गमित दि.29.07.2026
- दि.21.07.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- दि.21 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय .