राज्यात पुढील 4 दिवस धोक्याचे संकेत ; अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता – सरकारकडून तातडीची मदतीकरीता हेल्पलाईन क्रमांक जारी .

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Warning signs in the state for the next 4 days; Heavy rain likely to cause major damage ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे पुढील चार दिवस अति-धोक्याचे संकेत देण्यात आले आहे.

पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे नागरिकांची गैरसोय होईल , याकरीता सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्राचा परिसरात अतिवृष्टी सह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

या दरम्यान वीजांच्या गडगडांसह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता  वर्तविण्यात आलेली आहे . आपत्कालीन स्थितीमध्ये 24 x 7  कार्यरत असणारी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून , 022-22027990 / 022-22794229 अथवा 022-22023039 व मोबाईल क्रमांक 9321587143 असे आपत्कालिन नंबर कार्यन्वित करण्यात आले आहेत .

राज्यात या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता : दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यातील मुंबई उपनगर , ठाणे , पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच अमरावती विभाग , अकोला जिल्हा मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

Leave a Comment