NPS राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर मोठा महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Very important GR issued by Finance Department regarding NPS ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 10.07.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांकरीता जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु असणाऱ्यांना प्राप्त ईआरएम प्रस्ताव त्याचबरोबर NPS प्रणाली अंतर्गत कर्मचारी निवृत्त अथवा मृत्यु झाल्याने Exit Withdrawal करीता प्राप्त असणाऱ्या प्रस्ताव मध्ये मिसिंग क्रेडीट रकम आळल्यास सदर शासन निर्णयांमध्ये नमुद कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

कर्मचाऱ्याचे मृत्यु प्रकरण गहाळ रकमा बाबत कार्यवाही : राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( OLD PENSION ) झाले असल्यास , त्याच्या कायदेशिर वारसाकडून निर्णयांमध्ये नमुद बंधपत्र घेण्याचे निर्देश आहेत . ( बंधपत्र नमुने निर्णयाच्या शेवटी नमुद आहेत . )

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गहाळ रकमा बाबत कार्यवाही : राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गहाळ रकमा असल्यास , आहरण व संवितरण अधिकारी यांनी याबाबत सविस्तर  प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस प्रणाली अंतर्गत गहाळ रकमा व त्यांच्या प्रान खाती जमा करणे बाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे . कालमर्यादा कालावधी पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कार्यवाही   कार्यवाहीचा महिना
आहरण व संवितरण अधिकारी यांनी गहाळ रकमांचा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करणेएप्रिल मे  जुनऑगस्ट सप्टेंबर  जुनडिसेंबर जानेवारी फेब्रुवारी
अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी गहाळ रकमांच्या नोंदी सेवार्थ प्रणालीत घेणे
02.गहाळ रक्कमा व्याजाची परिगणना करणे .जुलैनोव्हेंबरमार्च
अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी गहाळ रकमां संदर्भात एससीएफ तयार करुन CRANPSCAN प्रणालीमध्ये अपलोड करणे व गहाळ रकमा संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रान खाती जमा करणे

Leave a Comment