12 वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे संदर्भात परिपत्रक दि.22.01.2026

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding application of senior category to employees completing 12 years ] : बारा वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे संदर्भात जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की , दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रशिक्षण अर्हतेसह बारा वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शाळेत कार्यरत / सेवानिवृत्त पात्र प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , केंद्रप्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे .

याकरिता कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तकाचे प्रथम पान , नियुक्ती दिनांकाची नोंद  घेण्यात आलेले सेवा पुस्तकाचे पान ,सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आलेल्या पानाची साक्षांकित प्रत , सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्र , नियुक्तीच्या वेळी धारण केलेले शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र …

व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र , विभागीय चौकशी चालू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र , प्रथम नियुक्ती आदेश , यापूर्वी वरिष्ठ श्रेणी मंजूर केली असल्यास त्याबाबतची सेवा पुस्तकातील नोंद , जात वैधता प्रमाणपत्र , हिंदी मराठी भाषा सूट …

गोपनीय अहवाल , ज्या वर्षात वरिष्ठ श्रेणीस पात्र ठरत असेल त्या वर्षाच्या निकट पूर्वीचे दोन वर्षाचे गोपनीय अहवाल साक्षात करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..

या संदर्भात सादर करायची माहितीचा तक्ता परिशिष्ट अ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भातील सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..

Leave a Comment