Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Three major and important government resolutions (GRs) were issued on December 23, 2025, regarding state officers/employees. ]: राज्य अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 23.12.2025 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सामान्य प्रशासन विभाग : मंत्रालयीन सह सचिव व उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देणेबाबत सा.प्र.विभाग मार्फत दिनांक 23.12.2025 रोजीच्या निर्णयानुसार शासन आदेश देण्यात आले आहे . शासन अधिसुचना दिनांक 02 फेब्रुवारी 2022 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2022 प्रसिद्ध करण्यात आले आहेत .
सदर नियमानुसार सर्व नागरी सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना पायाभुत , उजळणी व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहेत .यांमध्ये मंत्रालयीन सह सचिव व उप सचिव पदोन्नत झालेल्या व पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणाकरीता पात्र असणाऱ्या परंतु सेवानिवृत्तीस 02 वर्षे अथवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असणाऱ्या निर्णयात नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातुन सुट देण्यात येत आहेत .
02.विधी व न्याय विभाग : निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील अधिक्षक गट ब , प्रमुख लिपिक व वरिष्ठ लिपिक गट क या पदांवर दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पुर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून पुर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत विधी व न्याय विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
03.उद्योग उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग : उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट अ ( एस – 27 रुपये 123100-215900 ) या पदावर पदोन्नती देणेबाबत उद्योग उर्जा , कामगार व खनिकर्म विभागाच्या दिनांक 23.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
आपण जर सरकारी / निमसरकारी कर्मचारी असाल तर कर्मचारी विषयक नियमित माहिती ( शासन निर्णय/ परिपत्रक इ.) मिळविण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना स्तर -01 मध्ये जमा रक्कम विकल्पाबाबत ..GR निर्गमित दि.10.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबियांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागु करणेबाबत GR निर्गमित दि.10.07.2026
- शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 07 पोलिस आमदार मतदार संघ निर्माण करण्याबाबतची शिफारस व पाठिंबा …
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026
