@marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ These instructions will have to be followed in every office in the state. ] : राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये सरकारच्या दिनांक 20.11.2025 ( सा.प्र.वि ) रोजीच्या निर्णयातील आदेशांचे पालन करण्याच्या अनुषंगाने काही निर्देशांचे काटेकोपणे पालन करण्याचे निर्देश बाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.18.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , विधानसभा विशेषाधिकार समिती यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी आयोजित बैठकीत मा.सदस्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून सन्मानपुर्वक तसेच सौजन्यपुर्ण वागणूक देणेबाबत , मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे पुनरावलोकन करण्यात आलेले आहेत .
यानुसार सदर बैठकीत काही निर्देश देण्यात आले आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , विधानमंडळ / संसद सदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या पत्रांकरीता विहीत नमुन्यातील नोंदवही ठेवण्याच्या सुचना मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत .
सदर नोंदवह्या 02 महिन्यांत अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील नोंदवह्या एक महिन्यांच्या आत अद्ययावत करण्याच्या सुचना सा.प्र.विभागाकडून देण्यात आल्या आहेत .
तसेच संबंधित विभागाने / कार्यालयाने शासन निर्देशाप्रमाणे नेांदवह्या ठेवल्या आहेत अथ्वा नाही , लोकप्रतिधींच्या पत्रांवर कार्यवाही करण्यात आली आहे किंवा नाही याबाबतचा आढावा मा.पालकमंत्री यांच्याकडून घेण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले आहेत .

- युद्धविराम करीता इराणने अमेरिकेपुढे ठेवण्यात आल्या या प्रमुख मागण्या !
- दि.09.04.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 05 महत्वपुर्ण GR
- मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या दि.31 मार्च 2027 पर्यंत स्थगित – केंद्राचे सरकारचे सर्व राज्यांना निर्देश !
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.06.04.2026
- शिक्षकांचे निवृत्तीचे वय 55 वर्षे करण्याचा प्रस्ताव – आमदार सत्यजित तांबे ..