गुगल पे , फोन पे , पेटीएम अशा युपीआय पेमेंट ॲप्सवरुन व्यवहार करण्यास आकारली जाणार इतकी शुल्क ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ The fees charged for transactions on UPI payment apps like Google Pay, PhonePe, Paytm ] : युपीआय व्यवहार करण्याच्या नियमांमध्ये दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासुन बदल करण्यात आले आहेत . यांमध्ये अतिरिक्त शुल्काची देखिल तरतुद करण्यात आलेली आहे .

यांमध्ये खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय या बँकेकडून युपीआय व्यवहारांवर पेमेंट एग्रीगेटर्सकडून शुल्क वसुल केली जाणार आहे . तसेच सदर बँकेकडून एस्क्रो खाते असणाऱ्यांकडून 0.02% ( कमाल रुपये 06 ) तर बाहेरील खात्यांकरीता 0.04% ( कमाल 10 रुपये ) प्रति व्यवहार करीता चार्ज आकारण्यात येणार आहे .

यानुसार जर व्यवहार हा दहा हजार रुपयांचा असेल तर त्यावर 02 रुपयांचा चार्ज तर प्रति व्यवहार करीता कमाल 06 रुपये इतक्या मर्यादेत शुल्क आकारली जाईल . तर एस्क्रो खाते इतर बँकेचे असेल तर व्यवहार करीता 0.04% कमाल 10 रुपये इतका चार्ज आकारला जाईल .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती .

चार्ज नेमका कोणाला लागु होणार आहे ? : हे चार्ज फक्त पेमेंट एग्रीगेटर्सवर आकारले जाणार आहेत , थेट ग्राहकांवर कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही .म्हणजेच मर्चंट खाते असेल तर त्यावर देखिल अतिरिक्त चार्ज आकारले जातील .

सध्यस्थिती कोणत्या बँका चार्ज आकारतात ? : सध्यस्थितीमध्ये येस बँक , अक्सिस बँक व आता आयसीआयसी बँकेकडून हे चार्ज आकारले जात आहेत .

Leave a Comment