Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees to get 58% increase in dearness allowance before Raksha Bandhan ] : सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2025 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . आता परत माहे जुलैची डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . ही वाढ 03 टक्के असणार आहे .
केंद्र सरकारच्या कामगार विभाग मार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . यानुसार माहे जुन महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून , यामुळे जुलैची डी.ए वाढ निश्चित झाली आहे . जानेवारी ते जुन महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशांकाची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
| अ.क्र | महिना | ACPI निर्देशांक |
| 01. | जानेवारी 2025 | 143.2 |
| 02. | फेब्रुवारी 2025 | 142.8 |
| 03. | मार्च 2025 | 143 |
| 04. | एप्रिल 2025 | 143.5 |
| 05. | मे 2025 | 144 |
| 06. | जुन 2025 | 145 |
वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची डी.ए वाढ ही 3 टक्के इतकी असणार आहे . ज्यामुळे एकुण डी.ए हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतका होणार आहे .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026