पद कंत्राटी असले तरी कामाच्या दर्जा / शिक्षण नुसार सन्माजनक वेतन देण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश !

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ The court directed the government to pay a decent salary according to the level of work/education, even if the post is contractual. ] : सध्या देशांमध्येच कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे . कंत्राटीकरणाने अनेकांना हक्काच्या नोकऱ्या मिळत नसले तरी कंत्राटी तत्वावर नोकरी मिळाल्याने सन्माजनक वेतन मिळत नसल्याचे तक्रारी आहेत .

महाराष्ट्र राज्यांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण होत आहे . यामुळे कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यल्प वेतन मिळत आहेत . यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता नुसार सन्मानजनक वेतन मिळत नाहीत .

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : गुजरात राज्यांमध्ये कंत्राटी स्वरुपांमध्ये सहाय्यक प्राध्यापक हे पद भरले आहेत , सदर कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना प्रतिमहा 30,000/- रुपये मानधन तर नियमित सहाय्यक प्राध्यापकांना 1,36,952/- रुपये इतके मासिक वेतन मिळते . त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरुप ( ॲड – हॉक ) तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांना प्रतिमहा 1,16,000/- इतके मानधन दिले जाते .

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

यावरुन सर्वोच्च न्यायालयांमध्ये सरन्यायाधिश पीएस नरसिंह व जयमाल्य बाग यांच्याकडून सुनावणी देताना म्हटले आहे कि , वेतन हे सन्माजनक स्वरुपात दिले जावे , जेणेकरुन देशांमध्ये शिक्षणांचे महत्व अबाधित राहील. अन्यथा शिक्षणाचं महत्व कमी होईल .

या निर्णयाचा संदर्भ देत महाराष्ट्र राज्यातील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये सुधारणा होवू शकेल . जसे कि महाराष्ट्र राज्यात कंत्राटी स्वरुपात भरले जाणारे शिक्षकांचा पगार हा केवळ 15 ते 25 हजार इतका असतो . यामुळे कंत्राटीकरणांमध्ये देखिल नियमित कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव न करता वेतन मध्ये मोठी तफावत असू नये . असे कंत्राटी कर्मचाऱ्यांची धारणा आहे .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment