Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of outstanding salary payments dated 21.01.2026] : थकीत वेतन देयके अदा करणे संदर्भात दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत वेतन ऑनलाईन शालार्थ प्रणाली मध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत . सन 2025- 26 मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणाली मध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डी डी ओ 01 मुख्याध्यापक शाळा स्तर यांना दिनांक 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
दिनांक 20 जानेवारी 2026 रोजीच्या थकीत देयकाबाबत ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्हा निहाय थकीत देयके प्रलंबित असल्याचा तपशील दिनांक 02 फेब्रुवारी 2026 पर्यंत जशी जशी पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्यानंतर सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्वीकृत केली जाणार नाहीत , तसेच विलंबामुळे देयके अदा होणेस अडचण निर्माण झालेच त्याची सवस्ती जबाबदारी संबंधित आस्थापन प्रमुख यांची राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..