Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding transfer of service of state employees issued on 24.07.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरण बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 24 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासन सेवामध्ये निवडीने नियुक्ती ही केंद्र सरकारच्या भारतीय प्रशासन सेवा नियम 1954 मधील भारतीय प्रशासन सेवा विनियम 1997 या अधिनियमानुसार करण्यात येणार आहे .
याकरीता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची अत्युकृष्ट गुणवत्ता व क्षमता असणे आवश्यक असेल , तसेच राजपत्रित पदावर स्थायीकरण झालेले असावेत . तसेच उप-जिल्हाधिकारी या पदाशी समकक्ष घोषित पदावर निवडसुची वर्षाच्या दिनांक 01 जानेवारी रोजी किमान 08 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल .
तसेच निवडसुचीच्या वर्षांच्या दि.01 जानेवारी रोजी त्याचे वय हे 56 वर्षांपेक्षा जास्त नसावेत . तसेच भारतीय प्रशासन सेवा ( निवडीने नियुक्ती ) अधिनियम , 1997 मधील नियम 4 च्या तरतुदीनुसार , संबंधित उमेदवारांची उप- जिल्हाधिकारी पदांच्या समकक्ष पदावर 08 वर्षांची सलग व प्रत्यक्ष सेवा होणे आवश्यक आहे .
तसेच सेवा कालावधीनुसार 20 गुण दिले जातील . यांमध्ये 23 वर्षे व त्यावरील सेवा करीता 20 गुण तर किमान 08 वर्षे सेवा करीता 05 गुण यानुसार सेवा कालावधीनुसार गुण दिले जाणार आहेत .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !