शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षकेत्तर पदांच्या ( लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदांच्या तब्बल 17,500 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Recruitment for non-teaching posts under the Education Department.. ] : राज्य शिक्षण विभागांमध्ये तब्बल 17500 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

यांमध्ये प्रामुख्याने लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सन 2005 नंतर तब्बल 20 वर्षानंतर शिक्षकेत्तर पदांसाठी सर्वात मोठी पदभरती असणार आहे . यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .

यांमध्ये कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) असे एकुण 17500 रिक्त पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

लिपिक : लिपिक पदाकरीता उमेदवार हे 12वी  उत्तीर्ण तर टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

ग्रंथपाल : पदवी , ग्रंथपाल डिप्लोमा / पदवी

प्रयोगशाळा सहाय्यक : 12 वी विज्ञान

सदरची पदभरती ही राज्यातील अनुदानित शाळा तसेच राज्य शासनांच्या शिक्षण विभाग अंतर्गत होणार आहे . सदर पदभरती ही पुर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे .

Leave a Comment