Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Summer vacation declared for schools in the state from this day ] : राज्यातील शाळांना या दिवशी पासुन उन्हाळी सुट्टी जाहीर करणेबाबत , शिक्षण संचालनालय मार्फत दि.28.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्य शासनाच्या राज्य मंडळ अंतर्गत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टी मध्ये एकवाक्यता आणण्याच्या अनुषंगाने तसेच पुढील नविन शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .
यानुसार राज्यातील सर्व मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक 02.05.2026 वार शनिवार पासुन उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .तर शाळा स्तरावर एखादे उपक्रम सुरु असल्यास शाळा प्रशासन स्तरावर उचित निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात विदर्भ तसेच इतर सर्व विभाग मधील राज्य मंडळाच्या शाळा ह्या दिनांक 15.06.2026 वार सोमवार पासुन सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
माहे जुन महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेवून त्या ठिकाणच्या शाळा ह्या दिनांक 15.06.2026 ते दि.29.06.2026 या काळात शाळा ह्या सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 या वेळेत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- 📰 महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग बाबत महत्वपूर्ण माहिती..
- 🚨 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर वेतन बाबत मोठी बातमी!
- 📰 महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख बातम्या … दि.01.09.2026
- भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026