Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ GR issued on 25.03.2026 regarding giving awards/prizes for excellent work to boost morale of officers/employees. ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मनोर्धर्य वाढविणे करीता उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार / बक्षिसे देणेकामी महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 25.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोर्धर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरीता त्यांना राज्य स्तरावरुन पुरस्कार / बक्षिसे देण्याची योजना दिनांक 06.10.2000 च्या शासन निर्णयानुसार लागु करण्यात आली आहे .
सदर योजनानुसार वन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनी वन संरक्षणार्थ / वन्यजीव , संरक्षणार्थ / शोधकार्य / वन व्यवस्थापन / नाविन्यपुर्ण शोध या बद्दल प्रतिवर्षी सुवर्ण व रजत पदक बहाल करुन गौरविण्यात येते .
सदर योजनानुसार पदके देण्यापुर्वी वन विभागातील सर्व संबंधित मुख्य वन संरक्षकांकडून उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या नावाच्या शिफारशी मागविण्यात येतात .
सदर शिफारशीस अनुलक्षून त्यांनी केलेल्या नाविन्यपुर्ण कामाचे स्वरुप तसेच त्यांचे गोपनिय अहवाल , सचोटी , चारित्र्य , तांत्रिक कार्यक्षमता , बुद्धिमता व त्यांनी विकसित केलेली तंत्रज्ञान इ. बाबींचा विचार करुन पदके प्रदान करण्याकरीता अधिकारी / कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे .
सदर पदके गौरविण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026