Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ rain Update for next 48 hours ] : राज्यामध्ये पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सविस्तर हवामान अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .
आज दिनांक 22 जुलै रोजी राज्यामध्ये कोकण , मराठवाडा दक्षिण व मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . पुढील 24 तासांमध्ये ठाणे , मुंबई या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे .
आज पासून पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी लगत असणारी जिल्हे यामध्ये सिंधुदुर्ग , रत्नागिरी ,रायगड या जिल्ह्यांना अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर पुढील 48 तासांमध्ये कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे त्याचबरोबर धुळे , नंदुरबार , अहिल्यानगर ,नाशिक , जळगाव या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : शिधापत्रिका धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट ;
तर मराठवाडा मध्ये नांदेड , धाराशिव , लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता तर हिंगोली , परभणी , जालना , बीड , छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
तर विदर्भामध्ये गडचिरोली , गोंदिया , नागपूर , भंडारा , अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस तर चंद्रपूर , वर्धा , गडचिरोली , यवतमाळ , वाशिम , अकोला , बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !