Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Pension Revolution Movement of state employees at Vidhibhavar Nagpur to demand old pension. ] : जुनी पेन्शन योजना मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे विधीभवन नागपुर येथे पेन्शन क्रांती आंदोलन आयेाजित करण्यात आले आहेत .
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी विधानभवन नागपुर येथे पेन्शन क्रांती आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत . याबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 01.11.2005 रोजी व त्यानंतर नियुक्ती राज्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1984 अंतर्गत जुनी पेन्शनचे लाभ बंद केल्याने सदर कर्मचाऱ्यांचे भविष्य हे अ-सुरक्षित झाले आहेत .
त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्याच्या मागणीकरीता राज्यातील लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत .शासन कपातीवर आधारित डीसीपीएस / एनपीएस योजनाची अंमलबजावणी करण्यात व त्यातुन पेन्शनचा लाभ देण्यात पुर्णत : अपयशी झाल्यानंतर शासनाने नव्याने कपातीवर आधारित सुधारित राष्ट्रीय ..
निवृत्तीवेतन योजना व एकीकृत निवृत्तीवेतन योजना अश्या योजना लागु करण्याबाबत सरकारने धोरण जाहीर केले आहेत . व एनपीएस , आर एन पीएस , युपीएस या सारख्या असुरक्षित योजना कर्मचाऱ्यांच्या माथी बळजबरीने लादत आहेत .
सरकारने या योजना बाबत धोरण म्हणजे डोळे असून आंधळेपणाचे सोंग आहे असे नमुद करण्यात आले आहेत .राज्यातील कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करावी हिच आहे .
अन्य कोणत्याही योजना कर्मचाऱ्यांवर लादने कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा आहे . केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्तीवेतन योजना बाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था असुन युपीएस अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांना सरकारच्या आता अशा कोणत्याही योजनांवर विश्वास राहीलेला नसुन , जुन्या पेन्शन योजना ऐवजी अन्य कोणतीही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्य देवूच शकत नाही अशी धारणा झाली आहे .
सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे , त्यामुळे जुन्या पेन्शनच्या मागणीकरीता राज्यातील लाखो कर्मचारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात दिनांक 15.12.2025 रोजी विधानभवन नागपुर येथे पेन्शन क्रांती आंदोलन केले जाणार आहे . त्याबाबत सदर नोटी देण्यात येत आहे .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026