शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पदभरतीचे , नियुक्तीचे व वेतन करीता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करणेबाबत मार्गदर्शक सुचना GR दि.22.04.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Guidelines regarding the inclusion of non-teaching staff—specifically concerning recruitment, appointment, and salary—within the ‘Sevarth’ system (GR dated 22.04.2026). ] : स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे , नियुक्तीचे व वेतन करीता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करण्याच्या मार्गदर्शक सुचना संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दि.22.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सदर आश्रमशाळामधील शिक्षकेत्तर कोणतेही पद हे सेवानिवृत्ती , मृत्यु , राजीनामा , स्वेच्छा निवृत्ती इ. कारणांमुळे रिक्त झाल्याच्या नंतर प्रचलित आरक्षण धोरण नुसार सदर पद कोणत्या प्रवर्गातुन भरणे अपेक्षित आहे याची खात्री करण्याकरीता बिंदुनामावली संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून पडताळणी करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदर पद सरळसेवा भरतीने भरण्याकरीता विवक्षित पद कोणत्या प्रवर्गाकरीता राखची आहे , पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादाची अट , सदर पद अनुदानित / अंशत : अनुदानित संच मान्यतानुसार पायाभूत पदांमध्ये सदर पदांचा समावेश आहे अथवा प्रस्तावित वाढीव पद आहे , पदाचे मानधन / वेतन श्रेणी इ. बाबतच्या तपशिलाचा अंतर्भाव मान्यतेच्या प्रस्तावामध्ये असणे आवश्यक असणार आहे .

तसेच रिक्त पदावर संस्थेने कोणाचीही नियुक्ती केली नसल्याचे तसेच सदर रिक्त पदाबाबत , न्यायालयीन वाद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच पदभरतीच्या जाहीरातीचा मान्यतेचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करताना संस्था संचलित कोणत्याही आश्रमशाळेमध्ये सदर संवर्गातील पद अतिरिक्त नसलेबाबत तसेच अनुकंपा तत्वावर पदभरतीचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसलेबाबत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचा या पदांचा समावेश : कनिष्ठ लिपिक / वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , वसतिगृह अधिक्षक , स्वयंपाकी , मदतनीस , कामाठी ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment