Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Major update regarding the salary for August (payable in September 2026); circular issued on July 31, 2026. ] : माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दि.31.07.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेला आहे सेवार्थ प्रणालीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत वित्त विभागाच्या दि.27.03.2026 रोजीच्या परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले होते . तसेच माहे मे 2026 पर्यंत ई-केवायसी पुर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती .
वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि.28.07.2026 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तात्काळ पुर्ण करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशानुसार , अंशत : अनुदानित , खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 या वेतन देयक अगोदर ई -केवायसी पुर्ण करणे आवाश्यक आहे .
सदर ई-केवायसी पुर्ण न केल्यास , संबंधित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे व याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद् घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR