कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकित वेतन , वैद्यकीय बिल साठी दि.15.02.2026 पर्यंत मुदत .

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी  [ Letter regarding uploading of digital service records of employees in the Shalaartha system ] : कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्ड अपलोड करणे संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणाली मध्ये योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन , वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळा मधील अदा करता येणार नाही , असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे .

यामुळे ज्या शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवर कागदपत्रे DDO  2 , शिक्षणाधिकारी /विभागीय शिक्षण उपसंचालक /सचिव या स्तरावर रिजेक्ट झाली असल्यास , त्याबाबत वैध व अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असणार आहे .

चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वय 60 व पेक्षा जास्त व इतर करिता 58 वर्षापेक्षा जास्त त्याचबरोबर कमांडंट पदावरील वय 62 असल्यास , अशा कर्मचाऱ्यांच्या जन्म तारखेबाबत DDO -01 व डीडीओ –  02 यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास , उपसंचालक यांच्याकडून सदर जन्मतारीख तपासणी करून घेण्याचे कार्यवाही दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहेत .

यु-डायस क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये प्राथमिक , माध्यमिक यापैकी एका स्तरावर एकाच यु-डायसवर दोन किंवा अधिक शाळेचे देखील अदा होत असल्यास , असे देयके अदा करता येणार नाहीत , असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहेत .

Leave a Comment