सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन डी.ए वाढ ; एकुण DA 67% पर्यंत .. जाणुन घ्या सविस्तर आकडेवारी !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Last three DA increases in the 7th Pay Commission ] : सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपुष्टात येणार आहे . परंतु आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु होण्यास विलंब असल्याने , पुढील 18 महिने पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ दिली जाणार आहे .

आठवा वेतन आयोग समितीस पुढील 18 महिने पर्यंत कामकाज करण्यास मुदत दिली असून , माहे मे 2025 पर्यंत सदर अहवाल सरकारकडे सादर करण्यात येईल . तर पुढील 02 महिन्यांत आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु केला जाईल .

यामुळे माहे जानेवारी 2026 , जुलै 2026 व जानेवारी 2027 पर्यंत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन  धारकांना सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे .

संभाव्य डी.ए वाढीचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .

अ.क्रमहिना / वर्षसंभाव्य डी.ए वाढ
01.जानेवारी 202661% ( 3 टक्के वाढ )
02.जुलै 202664% (3 टक्के वाढ )
03.जानेवारी 202767% (3 टक्के वाढ )

संभाव्य डी.ए वाढ 3 टक्के ग्राह्य धरण्यात आली आहे . यानुसार सातवा वेतन आयोगानुसारच शेवटपर्यंत 67 टक्के डी.ए वाढ होणार आहे .

Leave a Comment