@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Ananda’s update regarding salary for the month of January paid in February 2026 ] : माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 बाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , यासंदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णय (GR) नुसार सन 2025- 26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीत झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे .
यामध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , नगरपालिका शाळा , मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , माध्यमिक शाळांची तपासणी , जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलमनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने , शिक्षकांचे प्रशिक्षण , माध्यमिक शिक्षण , मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य …
क्रीडा व युवक सेवा , सचिवालय सामाजिक सेवा , शालेय शिक्षण क्रीडा विभाग इत्यादी लेखाशीर्षाखाली नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त राहून निधीचे वितरण करण्यात आले आहे . सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..