या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे दि.19.08.2025 पासुन राज्यभर बेमुदत काम बंद / संप ; जाणुन घ्या मागण्या !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Indefinite work stoppage/strike of these state officers/employees across the state from 19.08.2025 ] : दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासुन एनएचएमचे कर्मचाऱ्यारी बेमुदत संपावर गेले आहेत .

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हजारो तांत्रिक / अतांत्रिक अधिकारी / कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत . सदर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सर्व तांत्रिक / अतांत्रिक अधिकारी / कर्मचारी यांची संयुक्त समिती मार्फत सदर बेमुदत काम बंद / संप आयोजित करण्यात आला आहे .  

प्रमुख मागण्या : छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात यावेत . तसेच 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी .

तसेच सदर निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत समान काम समान वेतन लागु करण्यात यावे . त्याचबरोबर NHM अधिकारी / कर्मचारी यांना त्वरीत वेतन वाढ लागु करण्यात यावी .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत शिपाई ( गट ड) पदासाठी महाभरती..

अशा प्रमुख चार मागण्यांसाठी दिनांक 19 ऑगस्ट पासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी / कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत .

Leave a Comment