नविन / आठवा वेतन आयोग बाबत सरकार मार्फत देण्यात आली महत्वपुर्ण माहिती ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important information provided by the government regarding the new/eighth pay commission; know in detail. ] : आठवा / नविन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून मोठी महत्वपुर्ण माहिती देण्यात आली आहे .

केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आठवा वेतन आयोग संदर्भात खासदर सागरिका घोष यांनी राज्यसभेत 03 प्रश्न उपस्थित केले होते . या प्रश्नास अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी प्रतिउत्तर दिले आहे .

यांमध्ये विचारण्यात आले कि , नविन वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतपणे मान्यता देणारी अधिकसुचना केव्हा जारी करण्यात येईल , यावर वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले कि , या संदर्भात संबंधित विभाग व राज्यांच्या प्रमुखांकडून याबाबत सुचना मागविण्यात आलल्या असून , विहित मुदतीमध्ये वेतन आयोग संदर्भातील शिफारशी सादर करण्यात येईल , अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

दर दहा वर्षांनी नविन वेतन आयोग लागु केला जातो , यामुळे सदर मुदत ही डिसेंबर 2025 ला संपुष्टात येणार आहे . यामुळे दिनांक 01.01.2025 पासुन नविन वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे . या संदर्भात आर्थिक स्थिती लक्षात घेवून नविन वेतन आयोग संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल , अशी बाब नमुद करण्यात आली आहे .

हे पण वाचा : राज्याच्या एका सेवेतुन दुसऱ्या सेवेत रुजु होणाऱ्यांना सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ अनुज्ञेय बाबत , वित्त विभागाचे महत्वपुर्ण परिपत्रक !

सद्य स्थितीचा विचार करता नविन वेतन आयोग कधी लागु केला जाईल ? : सध्य स्थितीचा विचार करता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित फिटमेंट फॅक्टरनुसार माहे जुलै 2026 पर्यंत नविन वेतन आयोग लागु केला जावू शकतो .

Leave a Comment