Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular of the Finance Department regarding the admissibility of pension benefits by combining services for those joining from one state service to another. ] : राज्य कर्मचाऱ्यांने राज्याच्या एका सेवेतुन दुसऱ्या सेवेत निवड झाल्याने , दुसऱ्या सेवेत रुजु झाल्यानंतर सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ अनुज्ञेयबाबत वित्त विभाग मार्फत दिनांक 18.08.2009 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 31.10.2005 नुसार राज्य शासनांच्या सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली आहे .
या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली वित्त विभागाची दिनांक 24.02.2009 व दि.16.07.2009 रोजीची परिपत्रके रद्द करण्यात आलेली आहे . तसेच दिनांक 01.11.2005 पुर्वी शासन सेवेत निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांने त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेच्या पदावरील नियुक्तीसाठी दिनांक 01.11.2005 पुर्वी अथवा त्यानंतर अर्ज केला असेल व त्याला ..
दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नविन पदावर नियुक्त करण्यात आले असेल , तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक वित्त विभागाच्या दिनांक 12.01.2007 रोजीच्या निर्णयातील नमुद नियम 1982 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागु ठरणार आहे . जर सदर परिपत्रकातील नमुद अटी / शर्तींची पुर्तता ज्या प्रकरणी होत नसेल ..
अशा शासकीय कर्मचाऱ्यांस नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु ठरणार आहे . सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असणारी निवृत्तीवेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागु आहे .
अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे इ. च्या सेवेमध्ये दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारांसह लागु ठरणार आहेत .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026