नविन सेवानिवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) विकल्प सादर करणेबाबत GR निर्गमित दि.25.08.2025

Spread the love

Marathisahita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding New Pension Scheme (NPS) issued on 25.08.2025 ] : नविन निवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु असणाऱ्या महाराष्ट्र संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना विकल्प सादर करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.25.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने लागु करण्यात आलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणे संदर्भात दिनांक 20.01.2025 ची अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . तसेच पेन्शन निधी विनियामक व विकास प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक 19.03.2025 व दि.26.06.2025 च्या अधिसुचनेद्वारे पेन्शन निधी विनियामक व विकास प्राधिकरण …

नियम 2025 जारी करण्यात आला आहे . त्यानुसार युपीएस योजना दिनांक 01.04.2025 पासुन अंमलात आली असून दिनांक 30.09.2025 पर्यंत केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना युपीएस निवडणेबाबतचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : मीरा भाईंदर पालिका आस्थापनेवरील गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

त्या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना एनपीएस लागु आहे त्यांना युनिफाईड पेन्शन योजना मध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास त्यांचे विकल्प सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यांमध्ये विकल्प सादर करणेबाबतचे नमुने , कार्यपद्धती नमुद करण्यात आलेली आहे .

Leave a Comment