Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of salary from May 2026 paid in June 2026 issued on 13.05.2026 ] : माहे मे 2026 पेड इन माहे जुन 2026 पासुनचे वेतन अदा करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दि.13.05.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खजगी शिक्षण संस्थामधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरिता प्रतिनिुयक्तीने कार्यरत आहेत .
अशा शिक्षकांची प्रतिनिुयक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .तसेच निवडणुक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मुळ आस्थापनेवर रुजु होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत . सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना ..
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थामधील शिक्षक निवडणुक व अन्य कामाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मुळ आस्थापनेवर रुजु होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर सदर सादर करण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करुन त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्याचे सुचित करण्यात आले आहेत .
तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही शिक्षक जर मुळ आस्थापनेवर रुजु झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 2026 इन माहे जून 2026 पासुनचे वेतन अदा होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026