Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध हक्क , अधिकार करीता नेहमीच लढा देत आहे . यांमध्ये सध्या शिक्षक पात्रता परीक्षा या प्रश्नांवर दिनांक 31.03.2026 रोजी महत्वपुर्ण प्रसिद्धती निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे .
या प्रसिद्धी पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देशातील शिक्षकांना 02 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहेत .
या निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांमध्ये असुरक्षिता तसेच ताण , संभ्रमाच्या भावना निर्माण झालेल्या आहेत . या पार्श्वभुमीवर जुनी पेन्शन संघटना मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर रिव्हु याचिका दाखल करण्यात आले आहेत . त्याचबरोबर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे .
तसेच शिक्षक बांधवांना सदर पत्रानुसार विश्वास देण्यात येत आहे कि , शिक्षक पात्रता परीक्षा पात्र नसल्याने , कोणत्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही , याकरीता संघटना पुर्ण ताकतीने शिक्षकांची बाजु घेणार आहे .
सध्याच्या पदोन्नती प्रक्रिया व केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा लक्षात घेता , सर्व सभासदांना याद्वारे सुचित करण्यात ज्या शिक्षकांना पदोन्नतीची संधी घ्यायची आहे , त्यांनी आपल्या सोयीने व आवश्यकतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा देण्याचा पर्याय स्वीकारावा .
परंतु संघटनाची भुमिका ही शिक्षकांच्या हिताचे संरक्षण करण्याचे राहील , अशी बाबत नमुद करण्यात आली आहे .तसेच शिक्षकांना नोकरीची हमी अबाधित ठेवण्यास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कटिबद्ध असणार आहे .

- युद्धविराम करीता इराणने अमेरिकेपुढे ठेवण्यात आल्या या प्रमुख मागण्या !
- दि.09.04.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 05 महत्वपुर्ण GR
- मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या दि.31 मार्च 2027 पर्यंत स्थगित – केंद्राचे सरकारचे सर्व राज्यांना निर्देश !
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.06.04.2026
- शिक्षकांचे निवृत्तीचे वय 55 वर्षे करण्याचा प्रस्ताव – आमदार सत्यजित तांबे ..