Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ How much honorarium and training allowance will the enumerators and supervisors who carried out the census work receive, and when? ] : जनगणना कामकाज केल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती व कधी मिळणार याबाबत सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .
प्रगणक व पर्यवेक्षकांना किती मिळणार जनगणना कामकाज मानधन : जनगणना कामकाज करीता प्रगणक व पर्यवेक्षकांना एकुण 25,000/- रुपये ( दोन्ही टप्पा करीता ) मानधन मिळणार आहे . यांमध्ये पहिला टप्पा प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पुर्ण झाले आहे . पहिल्या टप्पा करीता एकुण 9,000/- रुपये मानधन दिले जाणार आहे .
तर दुसऱ्या टप्पा करीता 16,000/- रुपये मानधन दिले जाणार आहे , दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 2027 मध्ये असेल . सध्या टप्पा 01 चे काम प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पुर्ण झाले आहेत .
पहिल्या टप्पाचे मानधन कधी मिळणार ? : सध्या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पहिल्या टप्याचे काम पुर्ण झाले आहेत . तर सदर कामकाज हे प्रमाणीकरण ( व्हेरिफिकेशन ) चे काम चार्ज अधिकाऱ्यांकडून सुरु आहे .
सदर काम पुर्ण झाल्याच्या नंतर पहिल्या टप्पाचे मानधन हे संबंधित प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यांमध्ये पीएफएमएस प्रणाली द्वारे थेट बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे .
प्रशिक्षण भत्ता : याशिवाय 03 दिवस प्रशिक्षण काळासाठी प्रति दिवशी 600/- रुपये प्रमाणे तीन दिवसाचे 1800/- रुपये प्रशिक्षण भत्ता देखिल अदा केला जाणार आहे . जर प्रशिक्षण स्थळी जेवण / नाष्टा दिला असेल तर सदर भोजनाची रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम अदा केली जाईल .
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश