Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Work assigned to teachers as BLOs (Booth Level Officers) on holidays. ] : SIR ( मतदान केंद्रस्तरती अधिकारी ) चे कामकाज दिलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी ( शालेय वेळेव्यतिरिक्त ) काम देणेबाबत आदेश दि.27.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
यानुसार नमुद करण्यात आले आहे कि , मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारत निवडणुक आयोगाच्या दि.18.01.2008 रोजीच्या पत्रानुसार शिक्षकांना रजेच्या दिवशी , अशैक्षणिक तासांमध्ये तसेच अशैक्षणिक दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कर्तव्ये पार पाडण्याबाबत सविस्तर सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .
यानुसार काही जिल्हा निवडणुक अधिकारी व मतदान नोंदणी अधिकारी यांनी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती देताना शिक्षकांच्या सेवा कायमस्वरुपी अधिग्रहीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत .
यामुळे सदर शिक्षकांना कायमस्वरुपी कार्यमुक्त करण्यात आलेले आहेत . या संदर्भात न्यायालयीन प्रकरणांमध्ये शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व शैक्षणिक कामाच्या वेळेत निवडणूक विषयक कामकाज न देता सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर निवडणुक विषयक कामकाज देण्याबाबत आदेशित केलेले आहेत .
शिक्षकांना संपुर्ण वेळेकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती न देता त्यांना सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज करण्याबाबत सुचना देण्यात याव्यात व मा.न्यायालयांच्या निर्देशाचे योग्यरितीने पालन करण्यात येईल , याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .



- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…
- राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली ; जाणून घ्या सविस्तर ..
- अखेर निवृत्ती वेतन धारकांसाठी आली गुड न्युज ; GR निर्गमित दि.18.08.2026
- पाचवा / सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये अनुक्रमे 5 टक्के , 9 टक्के वाढ करणेबाबत GR निर्गमित दि.18.08.2026