मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ The Supreme Court has given its verdict on a petition filed regarding paid leave during menstruation. ] : महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान असाह्य वेतन होत असतात , या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांना भर-पगारी रजा दिली जावी अशी महिला कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन मागणी आहे .

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा मिळावी अशा जनहित याचिकेवर दि.13.03.2026 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये सुनावणी झाली . यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि..

जर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान भर-पगारी सुट्टी देण्याचे धोरण निश्चित केल्यास , महिलांना कोणीही नोकरी देणार नाही , व त्यांना कामाचे वेतनांमध्ये मध्ये समानता राहणार नाही .यामुळे महिलांना नोकरीमध्ये मिळणारी समानता रद्द होईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अशा धोरणांमुळे महिलांना एक प्रकारचे कनिष्ठ दर्जा ठरविले जाईल , यामुळे अशा प्रकारचे जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे . यावेळी मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्यात यावे ,अशी बाजु मांडणारे वकील श्री.एम.आर.शमशाद यांनी उदा. देत नमुद केले कि ..

देशांमध्ये काही राज्ये व संस्था मासिक पाळी दरम्यान रजेकरीता पावले उचलली जात आहेत . यांमध्ये प्रामुख्याने केरळ राज्यांमध्ये मासिक पाळी दरम्यान सवलत देण्याचा उदाहरणे दिले . तसेच काही ठिकाणी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना स्व-इच्छेने अशा प्रकारची रजा अनुज्ञेय केली जाते .

परंतु सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट नकार दिल्याने , या संदर्भातील इतर जनहित याचिका रद्द केले व मासिक पाळी दरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास स्पष्ट नकार दिले आहेत .

Leave a Comment