Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ GR issued on 07.07.2025 regarding compassionate appointment to the heirs of deceased employees working in Group A, B and C cadres. ] : गट अ , ब व क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देणेबाबत नगर विकास विभागांकडून दिनांक 07.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या GR नुसार नमुद केले आहेत कि , राज्यातील नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी हे गट क संवर्गांमध्ये असून , अनुकंपा नियुक्ती देणेबाबत , राज्य सरकारच्या सा.प्र.विभागाच्या प्रचलित तरतुद नुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्ग मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना …
नगरपरिषद आस्थापना मधील गट संवर्गातील लिपिक ( CLERK ) संवर्ग , 6TH PAY COMMISSION नुसार वेतनश्रेणी 5200-20200 , ग्रेड वेतन – 1900/- रुपये , 7 वा वेतन आयोग नुसार वेतन 19900-63200/- रुपये अशा वेतनश्रेणी संवर्गांमध्ये दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच राज्य स्तर संवर्ग कर्मचाऱ्यांकरीता वारसांस अनुकंपा तत्वावर नगरपरिषदेच्या आस्थापना पदावरील लिपिक या पदावर नियुक्ती देण्याकरीता असणारी कार्यपद्धती सा.प्र.विभा मार्फत दिनांक 26.08.2021 रोजीच्या GR नुसार तरतुदींच्या अनुसरुन नगरपरिषद प्रशासन संचालन मार्फत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर जीआर मुळे राज्यातील नगर विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे .
