Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding holding school in morning session due to heat wave on 13.03.2026 ] : सध्या राज्यांमध्ये उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे , यामुळे शाळा ह्या सकाळ सत्रांमध्ये भरविणेबाबत अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या मार्फत दि.13.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिनस्त शासकीय / अनुदानित आश्रमशाळा सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच स्थानिक व भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये शाळांची वेळ सकाळी 8.00 ते 12.30 वाजेपर्यंत असणार आहेत . तसेच शाळांची मधली सु्ट्टी 30 मिनिटांची असणार आहे , तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागयांचे शासन निर्णय दिनांक 29.04.2011 नुसार शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणेकरीता निर्देशतत्वाचे उल्लंघन होणार नाही याची मुख्याध्यापकांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच शालेय प्रशासन सुरळीत चालविण्यासाठी शाळेची वेळही सकाळची असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष होणार नाही , त्याकरीता शिक्षकांनी दुपारुन पर्यवेक्षित अभ्यासाचे नियोजन करुन शिक्षक कर्मचारी पुर्णवेळ शाळेवर उपस्थित राहतील याची सर्व मुख्याध्यापक व प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026