Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued on 26.08.2026 regarding the recording of earned leave for personnel engaged in census and BLO duties. ] : जनगणना व बीएलओ चे काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाती अर्जित रजेची नोंद करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दि.26.08.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, ज्या कर्मचाऱ्यांनी जनगणना व बीएलओ चे राष्ट्रीय काम केलेल्या व करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खाती अर्जित रजा सेवा पुस्तकांमध्ये नोंद करणेबाबत शिक्षक महासंघ कोकण विभाग मार्फत निवेदन पत्रानुसार पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जनगणना व बी.एल.ओ च्या राष्ट्रीय कामाकरीता माहे मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीतही शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम केले आहेत .यामुळे सदर रजेच्या कालावधीत काम करणाऱ्या व केलेल्या शिक्षकांच्या खाती अर्जित रजा मिळण्याचा अधिकार असतो .
काम पुर्ण केल्याच्या नंतर सेवापुस्तकात सदर कालावधीची नोंद करणे अनिवार्य अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे . तसेच अर्जित रजा सुट्टीच्या काळांमध्ये काम केल्यास , त्या प्रमाणात तितके दिवस अर्जित रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येते .तसे सेवापुस्तकांमध्ये नोंद करण्यात येते .
सदरची बाब हि धोरणात्मक स्वरुपाची असल्याने , मा.प्रधान सचिव यांच्याकडे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;